Chennai: फूटबोर्डवर बसलेल्या तरुणाचा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून मृत्यू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

वैगई एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या अनारक्षित डब्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या बालमुरुगन यांचा तोल सुटला आणि प्लॅटफॉर्म 4 वर पडल्याची घटना दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.

Railway Track | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chennai: चैन्नईतील सैदापेट रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा विचित्र अपघात झाला आहे. वैगई एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. गर्दीने भरलेल्या अनारक्षित डब्याच्या पायऱ्यांवर बसलेल्या बालमुरुगन यांचा तोल सुटला आणि प्लॅटफॉर्म 4 वर पडल्याची घटना दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. यानंतर तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. हा भीषण अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (हेही वाचा- बस ड्रायव्हरकडून कुकीज घेण्यासाठी रोज बसची वाट पाहतो कुत्रा, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)