Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीतील वसंत विहार परिसरात बांधकाम ठिकाणी भिंत कोसळली, एकाचा मृतदेह सापडला
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी भिंती कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vasant Vihar Wall Collapsed: दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी भिंती कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच, घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. दिल्ली अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. या ढिगाऱ्याखाली शनिवारी पहाटे मजुराचा मृतदेह सापडला. ढिगाऱ्याखाली आणखी दोन मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी घडलेल्या घडनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष कुमार यादव असं मृताचे नाव आहे. (हेही वाचा- नवी मुंबईत डंपरने दुचाकीला चिरडले, अपघातात पोलिस हवालदाराचा मृत्यू, गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)