Presidential Election 2022: शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली 21 जूनला विरोधी पक्षांची बैठक, 17 पक्षांचे नेते राहणार उपस्थित
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी दुपारी 2.30 वाजता संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी दुपारी 2.30 वाजता संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला 17 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य 10,86,431 आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी 5,43,216 मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे एकूण 5.26 लाख मते आहेत, तर संपूर्ण विरोधक आणि अपक्षांची मिळून 5.60 लाख मते आहेत. विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे आणि नवीन राष्ट्रपतींना 25 जुलैपर्यंत शपथ घ्यायची आहे. अशा स्थितीत 24 जुलैपर्यंत नव्या अध्यक्षाची निवड होणे गरजेचे होते. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताना याची काळजी घेतली आहे. देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)