Molestor Thrashed in Ahmedabad Video: एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग, मोठ्या बहिणीने आरोपीला भर रस्त्यात बेल्टने केली बेदम मारहाण (पहा व्हिडिओ)

अहमदाबादच्या गजबजलेल्या रस्त्यावर दोन बहिणींनी विनयभंग करणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 44 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, 17 आणि 19 वर्षांच्या दोन बहिणी, कथित विनयभंग करणाऱ्याचा सामना करताना आणि नंतर त्याला सार्वजनिकपणे मारहाण करताना दिसत आहेत.

गुजरातमधील धक्कादायक घटनेत अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडिता आणि तिच्या मोठ्या बहिणीने विनयभंग करणाऱ्याला बेल्टने जबरदस्त माराहाण केली. अहमदाबादच्या गजबजलेल्या रस्त्यावर दोन बहिणींनी विनयभंग करणाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 44 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, 17 आणि 19 वर्षांच्या दोन बहिणी, कथित विनयभंग करणाऱ्याचा सामना करताना आणि नंतर त्याला सार्वजनिकपणे मारहाण करताना दिसत आहेत. आरोपीने शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला धडा शिकवताना सहकारी विद्यार्थ्यांनी दोन्ही बहिणींना साथ दिली. विजय सरकटे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now