Gujarat Accident: कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, गुजरात येथील घटना

गुजरात राज्यातील साबरकांठा- हिम्मतनगर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Gujarat Accident: गुजरात राज्यातील साबरकांठा- हिम्मतनगर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यांपैकी एक सात महिन्यांचा चिमुकल्या बाळाचा ही समावेश आहे. या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर  उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा ढाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व जण हिंमतनगरहून वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होऊन घरी परतत होते. त्यावेळीस हा अपघात झाला. (हेही वाचा- विलेपार्ले येथे भरधाव बेस्ट बसची धडक, तरुणाचा अपघाती मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now