Lungi and Nightie Ban: ग्रेटर नोएडा सोसायटीमध्ये लागू करण्यात आला ड्रेस कोड; नाईटी आणि लुंगी घालून फिरण्यावर बंदी
हिमसागर अपार्टमेंटचे एक पत्र इंटरनेट मीडियावर फिरत आहे. या पत्रावर सोसायटीच्या सचिवाची स्वाक्षरी आहे. सोसायटीत नाईटी आणि लुंगी घालून फिरू नका, असे लिहिले आहे.
Lungi and Nightie Ban: ऑफिस, कॉलेज, शाळा आणि इतर ठिकाणी ड्रेस कोडबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. ड्रेस कोडचा नवा मुद्दा समाजात समोर आला आहे. हिमसागर अपार्टमेंटचे एक पत्र इंटरनेट मीडियावर फिरत आहे. या पत्रावर सोसायटीच्या सचिवाची स्वाक्षरी आहे. सोसायटीत नाईटी आणि लुंगी घालून फिरू नका, असे लिहिले आहे. अलीकडे काही धार्मिक स्थळांवर ड्रेस कोडही लागू करण्यात आला आहे. आता सोसायटीमध्येदेखील ड्रेसकोड लागू करण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
समाजाने घेतलेला हा चांगला निर्णय असून सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे, विरोध करण्यासारखे काही नाही. जर स्त्रिया नाईटी घालतात आणि इकडे तिकडे फिरतात तर पुरुषांसाठी ते अस्वस्थ होईल आणि पुरुषांनी लुंगी घातली तर महिलांसाठी देखील अस्वस्थ होईल म्हणून आपण एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे, असं सीके कालरा, आरडब्ल्यूए अध्यक्षांनी एएनआयला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. (हेही वाचा - RBI Governor Shaktikanta Das यांचा लंडनमधील सेंट्रल बँकिंगतर्फे Governor of the Year पुरस्काराने सन्मान)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)