जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक, गोळीबारात एक नागरिक ठार
या गोळीबारात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांचे संयुक्त पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. दोन्ही बाजूंच्या गोळीबाराचा फटका एका स्थानिक नागरिकाला बसला. शोएब अह गनी नावाच्या या व्यक्तीला चकमकीत जखमी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) शोपियान जिल्ह्यातील (Shopian District) तुर्कवागम भागात सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांच्या संयुक्त पथकामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एक नागरिक जखमी झाला, त्याला उपचारासाठी श्रीनगरमधील एसएचएमएस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. रविवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या संयुक्त सुरक्षा दलाच्या जवानांवर अचानक गोळीबार केला, त्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांवर गोळीबार केला.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement