Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी (Watch Video)
लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान एक भिंत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात एका लग्नात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या मिरवणूकी दरम्यान एक भिंत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 20हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी 8, डिसेंबर रोजी लग्नाच्या आधीचा कार्यक्रमाची तयारी सुरु असताना ही घडना घडली. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी भागात ही घटना घडली आहे. भिंत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन महिला आणि जवळपास चार मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ घबराट पसरली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)