Dog Attack in Kanpur: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कानपूर येथील घटना

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Dog Attack in Kanpur

Dog Attack in Kanpur: दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा हल्ला वाढत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी तीन मुलांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर कुटुंबासोबत झोपलेली असताना, कुत्र्यांनी मुलांवर हल्ला केला. कुत्र्यांनी एका मुलांना ओढून नेले आणि दुसरा मुलगा जखमी झाला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याने वडिलांनी हबंरडा फोडला आहे. ही घटना कानपूर येथील गोविंद नगर सीटीआय चौकात घडली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- पैशांच्या लालसेपोटी पत्नीला किडनी विकण्यास पाडले भाग, पती आणि मध्यस्थाविरोधात पोलिसांत तक्रार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)