Building Collapse In Surat: सुरतमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्या खालून महिलेची सुखरुप सुटका, पाहा थरारक व्हिडिओ

या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये बचाव पथकाचा एक जवान ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

गुजरात (Gujarat) मधील सूरतमध्ये सततच्या पावसात 6 मजली घर कोसळल्याने (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु असून एका महिलेची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये बचाव पथकाचा एक जवान ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.  (हेही वाचा -  Building Collapse In Surat: गुजरातच्या सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळली; 12 हून अधिक जण जखमी, अनेकजण अडकल्याची भीती)

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now