New Delhi: सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आणि वारसा दाखवणारा 'ड्रोन शो' इंडिया गेटवर उजळून निघाले (Watch Video)

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, देश आता गुलामीच्या साखळ्या तोडत आहे आणि आपल्या वीरांची आठवण करत आहे.

Drone Show (Photo Credit - Twitter)

स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांचे जीवन आणि वारसा दाखवणाऱ्या इंडिया गेट (India Gate) संकुलावर ड्रोन शोने (Drone Show) आकाश उजळून निघाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संघर्षगाथा लोक आकाशात ड्रोनच्या माध्यमातून पाहत होते. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विविध चित्रांची रूपरेषा करून हा कार्यक्रम करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट दरम्यानच्या 'कर्तव्य पथ' या रस्त्याचे उद्घाटन केले. इंडिया गेटजवळील स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच पुतळ्याचेही त्यांनी अनावरण केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, देश आता गुलामीच्या साखळ्या तोडत आहे आणि आपल्या वीरांची आठवण करत आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)