Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: शिवानी रांगोळेच्या हातावर सजली विराजसच्या नावाची मेहंदी; पहा त्यांचा क्यूट व्हिडिओ

शिवानीच्या हातावर विराजसचं नाव मेहंदी मध्ये VIRYA असं लिहण्यात आलं आहे. तर विराजसनेही त्याच्या मनगटावर शिवानीचं नाव मेहंदीने लिहलं आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळी ही जोडी लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी केळवणाचे फोटोज, व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता लग्नाच्या पूर्वी होणार्‍या प्रमुख कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. काल रात्री शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी काढण्यात आली आहे. यावेळी विराजस आणि शिवानी दोघांनीही हिरव्या रंगांच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केले आहे.

शिवानी रांगोळेच्या लग्नाची मेहंदी

 

View this post on Instagram

 

A post shared by Kkanchan Mehendi 🦋 (@kkanchan_mehendi_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now