बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)
'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने मराठी भाषेतील अनेक रील्स डब करून सोशल मीडीयात पोस्ट केले आहेत पण आता एका झी मराठी वरील मालिकेसाठी विद्याने प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. 'कमळी' ही नवी मालिका सुरू झाली आहे. यामधील मुख्य पात्र कमळी शिक्षणाच्या ध्येयासाठी गावातून मुंबई मध्ये येते आणि तिचा प्रवास यावर मालिका बेतली आहे. दरम्यान 'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे. मालिकेत ‘कमळी’ची मुख्य भूमिका अभिनेत्री विजया बाबर साकारात आहे.
विद्या बालन सह कमळी चा प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)