Tunisha Sharma Death Case: उद्या तुनिशा शर्माच्या कुटुंबीयांची भेट घेणार PM Narendra Modi यांचे सहकारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले उद्या अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या घरी तिच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

Tunisha Sharma (PC - Instagram)

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अभिनेत्रीचा सहकलाकार शीजान खान याला चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. तुनिषाच्या कुटुंबीयांनी शीजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात अभिनेत्रीच्या काकांनी लव्ह जिहादचा आरोप केला आहे. शीजान खान पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर येत आहे. आता माहिती मिळत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले उद्या अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या घरी तिच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement