SaReGaMaPa Little Champs Marathi: वैशाली माडे, सलील कुलकर्णी, सुरेश वाडकर 'लिटिल चॅम्प्स' चे नवे परीक्षक; मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालक ! (View Promo)
लिटिल्स चॅम्पचं पहिलं पर्व हे आजही या रिलॅलिटी शो चं सर्वात लक्षवेधी ठरलं होतं. बदलत्या ट्रेंड्सनुसार आता या रिलॅलिटी मध्येही बदल करण्यात आले आहेत.
सारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं पर्व आता रसिकाच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. या पर्वामध्ये परीक्षकांच्या भूमिकेमध्ये सुरेश वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे दिसणार आहे. गेल्या पर्वात लिटिल चॅम्प्सचे पहिले पंचरत्न परीक्षक म्हणून दिसले होते पण त्यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता परीक्षकांच्या भूमिकेत डॉ.सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे दिसतील तर सुरेश वाडकर देखील विशेष मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यंदा देखील सूत्रसंचलन करणार आहे.
पहा प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)