Premachi Gost Promo: 'प्रेमाची गोष्ट' मधून तेजश्री प्रधान पुन्हा छोट्या पडद्यावर; पहा प्रोमो
तेजश्री प्रधान ने यापूर्वी 'होनार सून मी या घरची' मालिकेतून अमाप लोकप्रियता कमावली आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान पुन्हा रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो आता समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्री शुभांगी गोखले, संजीवनी जाधव दिसत आहेत. तर तेजश्रीच्या समोर राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. राज आणि तेजश्री यांची ही पहिलीच एकत्र मालिका आहे. 4 सप्टेंबर पासून रात्री 8 वाजता ही मालिका स्टार प्रवाह वर रसिकांना पाहता येणार आहे.
पहा प्रोमो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)