Hina Khan Tests Positive For COVID-19: अभिनेत्री हीना खानला कोरोना विषाणूची लागण; संपर्कातील सर्वांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन

या धक्यातून ती सावरतेय तोपर्यंतच माहिती मिळत आहे की, तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे

Hina Khan (Photo: Instagram)

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिला नुकताच पितृशोक झाला आहे. या धक्यातून ती सावरतेय तोपर्यंतच माहिती मिळत आहे की, तिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. होय, अभिनेत्रीने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे. हिनाने गेल्या दिवसात सांगितले होते की ती आता काही दिवसांपासून सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. त्याचबरोबर, तिची टीम तिचे सर्व सोशल मीडिया खाती चालवित आहे. आता तिला कोरोनाची लागण झाल्यांनतर तिने संपर्कातील सर्वांना आपली टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)