Elvish Yadav Booked For Beating Up: बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादववर गुन्हा दाखल; युट्युबरला केली होती मारहाण (Watch Video)

एल्विशने अनेक लोकांना सोबत आणल्याचे या व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ समोर आल्यापासून एल्विशवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आता या प्रकरणी गुरुग्रामच्या सेक्टर 53 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Elvish Yadav (PC - Instagram)

Elvish Yadav Booked For Beating Up: बिग बॉस ओटीटी जिंकून प्रसिद्धीझोतात आलेला यूट्यूबर एल्विश यादव सध्या वादात सापडला आहे. सापांची तस्करी आणि त्यांच्या विषाचा वापर ड्रग्ज म्हणून केल्याच्या प्रकरणातील त्याचा त्रास अजून कमी झालेला नव्हता. आता त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये एल्विश यादववर हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नुकतेच सागर ठाकूर (मॅक्सटर्न) याने सोशल मीडियावर एल्विश यादवविरोधात टिप्पणी केली होती. या कमेंटवर एल्विश यादवने यूट्यूबरला धमकी दिली होती. यानंतर दोन्ही यूट्यूबर्स गुरुग्राममधील एका दुकानात भेटले. एल्विश येथे येताच त्याने सागर ठाकूरला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा एक व्हिडिओही शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एल्विशने अनेक लोकांना सोबत आणल्याचे या व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ समोर आल्यापासून एल्विशवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आता या प्रकरणी गुरुग्रामच्या सेक्टर 53 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार स्वत: पीडित सागर ठाकूर याने दिली आहे. पोलिसांनी एल्विशविरुद्ध आयपीसी 147, 149, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी राजस्थानच्या जयपूरमध्येही एल्विशने एका रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला थप्पड मारली होती. (हेही वाचा: Kranti Redkar Gets Death Threats: मराठी अभिनेत्री आणि समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या; तक्रार दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now