Bigg Boss Kannada 11: बिग बॉसच्या इतिहासामध्ये प्रथमच सामान्य प्रेक्षकांचा घरात प्रवेश; थेट स्पर्धकांशी होणार भेट (Watch video)
घराच्या विशाल बागेत या लोकांसाठी खुर्च्या लावलेल्या आहेत. त्यानंतर, घराचे शटर उघडले जाते आणि स्पर्धक नवीन प्रवेश करणाऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी बागेत जातात.
Bigg Boss Kannada 11: बिग बॉस कन्नडचा नवीन सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षकांमध्ये यंदाच्या सिझनने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आता शोचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये टास्कचा एक भाग म्हणून स्पर्धकांची सामान्य प्रेक्षकांशी ओळख करून दिली जात असल्याचे दिसत आहे. कलर्स कन्नडच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या नवीनतम प्रोमोमध्ये, दिसत आहे की, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस कन्नड 11 मध्ये सामान्य लोकांना घरामध्ये आमंत्रित केले आहे. आता सामान्य प्रेक्षकांच्या अनपेक्षित प्रवेशामुळे शोवर काय परिणाम होईल याबद्दल प्रेक्षकांमध्ये लक्षणीय कुतूहल निर्माण झाले आहे.
प्रोमो क्लिपमध्ये लोकांचा मोठा गट घरात प्रवेश करताना दिसत आहे. घराच्या विशाल बागेत या लोकांसाठी खुर्च्या लावलेल्या आहेत. त्यानंतर, घराचे शटर उघडले जाते आणि स्पर्धक नवीन प्रवेश करणाऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी बागेत जातात. बिग बॉस कन्नड सीझन 11 हा 29 सप्टेंबर रोजी सुरु झाला. सुपरस्टार किच्चा सुदीप अकराव्यांदा हा शो होस्ट करत आहे. मात्र अलीकडेच, सुदीप याने शोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि सध्याचा हंगाम त्याचा शेवटचा असल्याचे उघड केले. (हेही वाचा: ‘Anupamaa’: भाजप नेत्या Smriti Irani करणार टीव्हीवर पुनरागमन; दिसणार रुपाली गांगुलीच्या अनुपमा शोमध्ये- Reports)
बिग बॉसच्या इतिहासामध्ये प्रथमच सामान्य प्रेक्षकांचा घरात प्रवेश-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)