BBM 4 Challengers: बिग बॉस मराठी 4 च्या घरात Rakhi Sawant ची दमदार एंट्री; Apurva Nemlekar ला पाहताच मारली 'ही' हाक (Watch Video)
राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम हे चार चॅलेजर्स बिग बॉस मराठी 4 च्या घरात दिसणार आहेत.
बिग बॉस मराठी 4 चा उत्तरार्ध आता सुरू झाला आहे. जेतेपदासाठी सारेच साम-दाम-दंड-भेद वापरत असताना आता या घरात पहिल्यांदाच चार नव्या चॅलेंजर्सची एंट्री झाली आहे. राखी सावंत, मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि विशाल निकम हे चार चॅलेजर्स आता घरात दाखल झाले आहेत. बिग बॉस मराठी 4 च्या घरात राखी सावंत ने एंट्री घेताच डायलॉगबाजी सुरू केली आहे. अपूर्वा नेमळेकरला तिने पाहताच 'ए शेवंंते...' म्हणून हाक मारली आहे.
पहा चॅलेंजर्सची एंट्री
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)