TV Show Set Worker Electrocuted: 'अनुपमा’च्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून मृत्यू; कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
दिलीप मंडल, असे मृताचे नाव आहे. आरे कॉलनी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
TV Show Set Worker Electrocuted: शुक्रवारी आरे कॉलनीतील फिल्मसिटीमध्ये 'अनुपमा’ टीव्ही शोच्या सेटवर एका 32 वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. दिलीप मंडल, असे मृताचे नाव आहे. आरे कॉलनी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल हे दिवे हलवत असताना त्यांना दुपारी विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासाअंती, त्यांनी असा निष्कर्ष काढला की, विद्युत ठेकेदाराने निष्काळजीपणा केला होता आणि पुरेशी खबरदारी घेतली नव्हती, ज्यामुळे मंडलचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतीय न्याय संहिता अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.
असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून मृत्यू -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)