Kamya Punjabi Joins Congress: अभिनेत्री काम्या पंजाबीने भाई जगताप यांच्या उपस्थितीत केला कॉंग्रेस पक्षात प्रवेश

अलीकडेच एका मुलाखतीत काम्याने सांगितले होते की, तिला राजकारणात यायचे आहे

Kamya Punjabi Joins Congress (संग्रहित संपादित प्रतिमा)

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने आज म्हणजेच बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि युवा नेते सूरजसिंग ठाकूर यांनी काम्याचे पक्षात स्वागत केले. काम्या अनेक दिवसांपासून राजकारणात जाण्याचा विचार करत होती. अलीकडेच एका मुलाखतीत काम्याने सांगितले होते की, तिला राजकारणात यायचे आहे, पण ती योग्य वेळेची वाट पाहत आहे. काम्या बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. ती शेवटची टीव्ही शो ‘शक्ति: अस्तिस्व के अहसास की’ मध्ये दिसली होती. हा टीव्ही शो काही दिवसांपूर्वी बंद झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement