साऊथ सुपरस्टार Ajith Kumra चा चाहता Thunivu च्या रिलीजचा आनंद करत होता साजरा, लॉरीवरून पडून 19 वर्षीय तरुणाचा झाला मृत्यू

दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अभिनेत्यांची नेहमीच देवासारखी पूजा केली जाते. अजित कुमारचे चाहते पहाटे 1 वाजता 'थुनिवू'चा शो पाहण्यासाठी आले होते.

Thunivu Poster (Photo Credit - Twitter)

अजित कुमारचा (Ajith Kumar) 'थुनिवू' (Thunivu) 11 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला. अशा परिस्थितीत चेन्नईमध्ये चित्रपटासंदर्भात सुरू असलेल्या महोत्सवादरम्यान एका एका 19 वर्षीय तरुण चाहत्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अभिनेत्यांची नेहमीच देवासारखी पूजा केली जाते. अजित कुमारचे चाहते पहाटे 1 वाजता 'थुनिवू'चा शो पाहण्यासाठी आले होते. संथ चालणाऱ्या लॉरीवर बसून आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरुणाला हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल याची कल्पनाही नव्हती. कसे माहीत नाही पण भरत लॉरीवरून खाली पडला आणि तो मरण पावला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement