Son of Sardaar 2: ब्रिटनचा व्हिसा न मिळाल्यामुळे संजय दत्तची 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटातून एक्झिट

मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता संजय दत्तला ब्रिटनचा व्हिसा मिळाला नसल्याचे समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, संजय दत्तचा व्हिसा त्याच्या मागील रेकॉर्डमुळे नाकारण्यात आला होता. संजय दत्तने ब्रिटनच्या व्हिसासाठी अर्ज करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती परंतु प्रत्येक वेळी त्याच्या हाती निराशा आली आहे.

Son of Sardaar 2

Son of Sardaar 2: अजय देवगणचा ॲक्शन कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' ची शूटिंग स्कॉटलंडमध्ये 24 जुलैपासून सुरू झाली. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाचा मुख्य अभिनेता संजय दत्तला ब्रिटनचा व्हिसा मिळाला नसल्याचे समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, संजय दत्तचा व्हिसा त्याच्या मागील रेकॉर्डमुळे नाकारण्यात आला होता. संजय दत्तने ब्रिटनच्या व्हिसासाठी अर्ज करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती परंतु प्रत्येक वेळी त्याच्या हाती निराशा आली आहे. या घटनेनंतर चित्रपटाच्या टीमने लवकरच संजय दत्तच्या जागी रवी किशनला चित्रपटात घेतले. रवी किशनचे अलीकडेच 'लपता लेडीज' या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेकांनी कौतुक केले आहे . 25 जुलै रोजी तो स्कॉटलंडमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सामील झाला होता. अशाप्रकारे संजय दत्तने चित्रपटातून एक्झिट केल्यानंतर निर्मात्यांना रवी किशनच्या रूपाने एक चांगला पर्याय सापडला आहे. हे देखील वाचा: ‘Bigg Boss 18’ Release Date: बिग बॉस 18 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता सलमान खान करणार होस्ट

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)