Seema Chandekar यांच्या दुसर्या लग्नात सासू ला जोडवी घालताना सून Mitali Mayekar भावूक (Watch Video)
सिद्धार्थ चांदेकरने आपल्या आईचं दुसरं लग्न काही दिवसांपूर्वी दणक्यात लावलं आहे. त्याच्या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
अभिनेत्री सीमा चांदेकर या वयाच्या साठीत दुसर्यांदा बोहल्यावर चढल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आईचं दुसरं लग्न देखील संपूर्ण विधिवत पद्धतीने लावून दिलं. लग्नात सासू सूनेच्या पायात जोडवी घालते. पण सीमा चांदेकरांच्या लग्नात हा मान सूनेने बजावला. यावेळी काहीशी मिताली भावूक झाली होती. सोशल मीडीयात तिने स्वतःच्या लग्नात सीमा चांदेकरांनी तिच्या पायात घातलेल्या जोडवीचे क्षण देखील शेअर केले आहेत. अभिनेता Siddharth Chandekar ने लावलं आईचं दुसरं लग्न; शेअर केली खास पोस्ट .
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)