प्रसिद्ध छायाचित्रकार Pradeep Bandekar यांचे निधन; शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्याकडून शोक व्यक्त
बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूवर शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला.
Pradeep Bandekar Dies: बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रदीप बांदेकर यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम बॉलीवूड पापाराझी वरिंदर चावलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. वरिंदर चावला यांनी एका भावनिक पोस्टमध्ये लिहिले की, 'आजचा दिवस इंडस्ट्रीसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. कारण दिग्गज फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांना गमावले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ते फक्त एक मार्गदर्शक नव्हते तर त्यांनी मला मुलासारखे वागवले. त्यांच्या जाण्याची पोकळी कधीही भरली जाऊ शकत नाही.' (हेही वाचा:Actor Suraj Mehar Dies In Road Accident: शुटिंग संपवून घरी जाताना कार अपघात, अभिनेता सूरज मेहर यांचा दुर्दैवी मृत्यू)
प्रदीप बांदेकर यांच्या निधनाने बॉलीवूड जगतात शोककळा पसरली असून, त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांची ही मोठी हानी आहे. त्यांनी त्यांच्या छायाचित्रांमुळे आणि कामामुळे इंडस्ट्रीतील अनेक लोकांवर प्रभाव टाकला होता.
बॉलिवूड फोटोग्राफर प्रदीप बांदेकर यांचा मृत्यू
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)