Annaatthe: रजनीकांतचा चित्रपट अन्नाथे बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ, 3 दिवसात 112 कोटींचा आकडा पार

समीक्षकाच्या मते, या चित्रपटाने वर्ल्डवाइड कलेक्शन 112.82 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Annaatthe (Photo Credit - Instagram)

साऊथमध्ये सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'अन्नाते' (Annaatthe) हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला आहे. समीक्षकाच्या मते, या चित्रपटाने वर्ल्डवाइड कलेक्शन  112.82 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 35 कोटींचा व्यवसाय करून खाते उघडले. बॉक्स ऑफिसवर एवढ्या मोठ्या ओपनिंगने सर्वांनाच चकित केले होते. दुसऱ्या दिवशी, 'अन्नाथे' 50 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी अन्नते हा दक्षिण उद्योगातील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने दोन दिवसांत 50 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10 कोटींचा व्यवसाय केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)