Amruta Fadanvis New Song: अमृता फडणवीस यांचे दिवाळी निमित्त खास गाणे ‘ओम जय लक्ष्मी माता’ प्रेक्षकांच्या भेटीला...
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचे खास गाणे दिवाळी निमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे खास वौशिष्ट्य म्हणजे अमृता फडणवीस यांना गायक सोनु निगमची (Sonu Nigam) साथ लाभणार आहे.
सगळीकडे दिवाळीची मोठ्याप्रमाणे तयारी सुरुवात झाली आहे. अशातच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देंवद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचे खास गाणे दिवाळी निमित्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे खास वौशिष्ट्य म्हणजे अमृता फडणवीस यांना गायक सोनु निगमची (Sonu Nigam) साथ लाभणार आहे. याबाबतची माहिती अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
या गाण्यातुन महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)