Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा केलं लग्नं; जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित मुनव्वरने 10-12 दिवसांपूर्वी लग्न केल्याचं समजत आहे.
Munawar Faruqui: ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. आता तो त्याच्या वैयक्तिक कारणाने चर्चेत आहे. मुनव्वरने 10-12 दिवसांपूर्वी लग्न केल्याची सध्या चर्चा आहे. जवळचे काही नातेवाईक व मित्र-मैत्रिणी उपस्थित त्याचा लग्न सोहळा(Marriage) पार पडला अशी माहिती टाइम्स नाऊने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुनव्वरचा निकाह आयटीसी मराठा इथं पार पडला. गुपचूप लग्न केल्याने लग्नाचे फोटो किंवा लग्नाशी संबंधित कोणतीच माहिती त्याने शेअर केलेली नाही. मात्र, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव एम वरून सुरू होत असल्याचे समजते आहे.(हेही वाचा:Munawar Faruqui Hospitalized: 'बिग बॉस 17' विजेता मुनवर फारुकी रुग्णालयात दाखल, प्रकृती पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता )
पोस्ट पहा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)