Mirzapur 3: 'मिर्झापूर 3' मध्ये दिसणार नाही 'मुन्ना भैया,' अभिनेता दिव्येंदू शर्माने घेतली माहिती

बहुचर्चित वेब सिरीज 'मिर्झापूर'च्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या मालिकेचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. आता 'मिर्झापूर 3' 4 वर्षांनंतर येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. या मालिकेतील मुन्ना भैय्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, मात्र आता हे पात्र चाहत्यांना पाहायला मिळणार नाही.

Mirzapur 3

Mirzapur 3: बहुचर्चित वेब सिरीज 'मिर्झापूर'च्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी या मालिकेचा तिसरा भाग येणार आहे, ज्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. आता 'मिर्झापूर 3' 4 वर्षांनंतर येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. या मालिकेतील मुन्ना भैय्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, मात्र आता हे पात्र चाहत्यांना पाहायला मिळणार नाही. दिव्येंदू शर्मा या मालिकेत मुन्ना भैय्याची भूमिका साकारत होता. पण 2 सीझननंतर आता तिसऱ्या सीझनमध्ये त्याचे पात्र काढून टाकण्यात आले आहे. याचा अंदाज या मालिकेच्या घोषणेपासूनच बांधला जात होता. पण आता खुद्द दिव्येंदूनेच याची पुष्टी केली आहे. मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आश्चर्यकारक आणि रोमांचक आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyenndu 💫 (@divyenndu)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement