Ved Lavlay Song Out: मराठमोळ्या 'वेड' सिनेमात 'वेड लावलय' गाण्यात पुन्हा दिसणार Salman Khan-Riteish Deshmukh चा स्वॅग; पहा इथे संपूर्ण गाणं (Watch Video)

रितेश वेड या मराठी सिनेमामधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 30 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Ved Lavlay | YouTube

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड सिनेमामध्ये पुन्हा सलमान खान आणि रितेश देशमुख ही जोडी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. 'वेड लावलय' या गाण्यामध्ये  सलमान आणि रितेश आपल्या खास अंदाजात थिरकताना दिसले आहे. रितेशच्या 'लय भारी' या सिनेमात सलमान खान 'भाऊ' या पात्रात दिसला होता. कॅमिओ म्हणून असला तरीही रसिकांच्या मनात 'भाऊ' ठसला होता आता तो पुन्हा 'वेड' मध्येही दिसणार आहे. अजय-अतुल चं हलकं फुलकं 'वेड लावलय' गाणं विशाल ददलानी आणि अजय गोगावले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

पहा वेड लावलय गाणं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now