Ved Lavlay Song Out: मराठमोळ्या 'वेड' सिनेमात 'वेड लावलय' गाण्यात पुन्हा दिसणार Salman Khan-Riteish Deshmukh चा स्वॅग; पहा इथे संपूर्ण गाणं (Watch Video)
रितेश वेड या मराठी सिनेमामधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 30 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड सिनेमामध्ये पुन्हा सलमान खान आणि रितेश देशमुख ही जोडी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. 'वेड लावलय' या गाण्यामध्ये सलमान आणि रितेश आपल्या खास अंदाजात थिरकताना दिसले आहे. रितेशच्या 'लय भारी' या सिनेमात सलमान खान 'भाऊ' या पात्रात दिसला होता. कॅमिओ म्हणून असला तरीही रसिकांच्या मनात 'भाऊ' ठसला होता आता तो पुन्हा 'वेड' मध्येही दिसणार आहे. अजय-अतुल चं हलकं फुलकं 'वेड लावलय' गाणं विशाल ददलानी आणि अजय गोगावले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
पहा वेड लावलय गाणं
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

