Ved Box Office Collection: मराठी चित्रपट 'वेड' ठरला सुपरहिट; पहिल्या आठवड्यामध्ये केली तब्बल 20.67 कोटींची कमाई
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड हा जेनेलिया डिसूझाचा पहिला मराठी पदार्पण चित्रपट आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या एका गाण्यात अभिनेता सलमान खानही दिसला होता.
रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शित पदार्पण देखील आहे. यामध्ये त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. आता माहिती मिळत आहे की, हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. वेडने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.67 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रितेश देशमुखने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, 'पहिल्या आठवड्याचे वेड लावणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स !!!! प्रेषकांचे कोटी कोटी आभार! आपले प्रेम असेच राहू द्या!'
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड हा जेनेलिया डिसूझाचा पहिला मराठी पदार्पण चित्रपट आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या एका गाण्यात अभिनेता सलमान खानही दिसला होता. माजिली या तेलगू चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. माजिलीमध्ये नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रमू यांची जोडी होती.
पहिल्या आठवड्याचे वेड लावणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन्स !!!!
प्रेषकांचे कोटी कोटी आभार!
आपले प्रेम असेच राहू द्या!
20.67Cr
Thank you for the stupendous first Week! #Ved pic.twitter.com/Fp5MjBuFVf
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2023 11:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

