Phullwanti Teaser Out: प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर रिलीज; पहा व्हिडिओ
प्रेक्षकांना हा चित्रपट 11 ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे. फुलवंती चित्रपटात पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा दाखवण्यात आली आहे.
Phullwanti Teaser Out: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर रिलीज (Phullwanti Teaser Out) झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट 11 ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार आहे. फुलवंती चित्रपटात पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा दाखवण्यात आली आहे. आज रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टिझरमध्ये फुलवंतीची लोकप्रियता किती आहे, हे समजते. या चित्रपटाची निर्मिती मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे. फुलवंतीची कथा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवरून साकारण्यात येत आहे.
‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर रिलीज; पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)