'Sarla Ek Koti' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, Isha Keskar मुख्य भूमिकेत!

सरला कोण आहे हे कोडं उलगडलं असलं तरी चित्रपटाचा विषय अजूनही गुपितच आहे.

Sarla Ek Koti: ‘देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साता जन्माचे वचन दिलंय’ अशी टॅगलाईन असलेलं सरलाचं पोस्टर आज सर्वांसमोर आलंय आणि ही सरला म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) आहे. कायम बबली, क्यूट गर्लवाल्या भूमिका साकारणारी ईशा या चित्रपटात ग्रामीण बाजातील लूकमध्ये दिसत आहे. सरला कोण आहे हे कोडं उलगडलं असलं तरी चित्रपटाचा विषय अजूनही गुपितच आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात 20 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement