Panchak Marathi Film: माधुरी दीक्षितच्या 'पंचक' मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पती Dr. Shriram Nene यांनी अमेरिकन शैलीतील मराठीद्वारे साधला संवाद (Watch Video)
श्रीराम नेने यांचा आरएनएम मूव्हिंग पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'पंचक' पुढील वर्षी 5 जानेवारीला रिलीज होणार आहे.
Dr. Shriram Nene Talks in American Style Marathi: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेने यांच्यासोबत निर्माता म्हणून तिच्या आगामी 'पंचक' या मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा आरएनएम मूव्हिंग पिक्चर्सचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'पंचक' पुढील वर्षी 5 जानेवारीला रिलीज होणार आहे. आजच्या या ट्रेलर रिलीजवेळी श्रीराम नेने यांनी मराठीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या अमेरिकन शैलीतील मराठीद्वारे या चित्रपटाबाबत माहिती दिली. सध्या नेने यांच्या या मराठी भाषेतील संवादाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पंचक या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर,आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी सागर शोध, संपदा कुलकर्णी ,आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, गणेश मयेकर आणि आरती वडगबाळकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. (हेही वाचा: Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचे बॉडी शेमिंग करणाऱ्या आणि ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, पाहा पोस्ट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)