Naal 2 Trailer: नागराज मंजुळेच्या बहुप्रतिक्षित 'नाळ 2' चा ट्रेलर प्रदर्शित; लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Watch)

'नाळ'मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला 'नाळ भाग 2'मध्ये मिळणार आहे.

Naal 2 Trailer

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केलेच यासह प्रेक्षकांनीही चांगली दाद दिली. त्यावेळी नाळला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. आता नाळ या चित्रपटाचा पुढील भाग नाळ 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित 'नाळ भाग 2' येत्या 10 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'नाळ'मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला 'नाळ भाग 2'मध्ये मिळणार आहे. (हेही वाचा: Panchak Movie: माधुरी दीक्षितचा 'पंचक' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला, हे कलाकार मुख्य भुमिकेत)

नाळ 2 ट्रेलर-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement