Marathi Film ‘Devmanus’: प्रेक्षकांसाठी पर्वणी! 'देवमाणूस’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सद्वारे केली जात आहे. या प्रोडक्शन हाऊसने अनेक प्रमुख हिंदी ब्लॉकबस्टर्सची निर्मिती केली आहे. आता महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
अभिनेते महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच एका प्रकल्पानिमित्त एकत्र येणार आहेत. महत्वाचे म्हणजे सुबोध भावेदेखील या चित्रपटात दिसणार आहे. तेजस देवस्कर दिग्दर्शित लव फिल्म्सचा पहिला मराठी चित्रपट ‘देवमाणूस’मध्ये हे तिघेही झळकणार आहेत. या चित्रपट 25 एप्रिल, 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सद्वारे केली जात आहे. या प्रोडक्शन हाऊसने अनेक प्रमुख हिंदी ब्लॉकबस्टर्सची निर्मिती केली आहे. आता महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे, 'देवमाणूस' या चित्रपटातून एकत्र आले आहेत ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. याबाबत लव म्हणाले, कला, संगीत आणि कथाकथनाचा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. आता आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना आनंद होत आहे. याबाबत रेणुका शहाणे म्हणाल्या, देवमाणूसच्या निमित्ताने मी महेशसोबत एकत्र काम करत आहे. मला खात्री आहे 'देवमाणूस' बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचे समाधान मिळेल. (हेही वाचा: Sangeet Manapman Movie Review: नाट्यमयता आणि अभिव्यक्तीवादासह ‘संगीत मानपमान’ नाटकाने सिनेमा केला खरा; मात्र, प्रेक्षकांची झाली निराशा)
'देवमाणूस’ मराठी चित्रपट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)