Maharashtra State Marathi Film Awards: सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केले 58 आणि 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने, जाणून घ्या यादी
Maharashtra State Marathi Film Awards: मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५८ आणि ५९ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या अंतिम फेरीची नामांकने घोषित केली आहेत. सन २०२० सालाच्या ५८ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी, मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन घोषित केले आहे. तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरीता जून, जयंती, फनरल या तीन चित्रपटांची नामांकने घोषित झाली आहेत.
सन २०२१ सालाच्या ५९ व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिंसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकने जाहीर करीत असून, प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम, कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन घोषित केली आहेत. (हेही वाचा: Lata Mangeshkar Award 2024: गायिका Anuradha Paudwal यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर 2024 पुरस्कार जाहीर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)