Maharashtra Shaheer Teaser: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेख सना शिंदेही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेख सना शिंदेही (Sana Shinde) या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तसेच या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या टीझरमधून शाहीर साबळे यांनी केलेलं कामही उलगडत जातं. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
पहा टीझर
रसिकहो,
मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर ज्यांनी जपला मराठी लोकसंगीत लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्यामुळे पोहोचली,
'महाराष्ट्र शाहीर' म्हटल्यावर आपसूकच 'साबळे' आडनाव ओठी येतं, https://t.co/n5X73u5Lpb
— Everest Entertainment (@EverestMarathi) March 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2023 02:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

