Jhimma 2 Teaser: 'पुन्हा खेळूयात आंनदाचा खेळ', नात्यांचा धडा शिकवणारा झिम्मा 2 चा टीझर लाँच, रिंकू आणि शिवानीच्या एन्टीनं वेधल मनरिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वेच्या एन्टीनं वेधल मन
झिम्मा चित्रपटाच्या भरघोष यशानंतर पुन्हा आता प्रेक्षकांच्या भेटीला झिम्मा चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने सृष्टीत चित्रपटाची चर्चा सुरु होती.
Jhimma 2 Teaser: झिम्मा चित्रपटाच्या भरघोष यशानंतर पुन्हा आता प्रेक्षकांच्या भेटीला झिम्मा चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने सृष्टीत या चित्रपटाची चर्चा सुरु होती. सिदार्थ चांदेकर यानी सोशल मीडियावर झिम्मा 2 चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. हा चित्रपट येत्या 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये दिसल्याप्रमाणे चित्रपटातील एकएक कलाकारांची ओळख होताना दिसत आहे. यंदाची ट्रिप ही खास असणार आहे. इंदूच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त या खास आणि धमाकेदार ट्रिपचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षकांना टीझर पाहून चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. पुन्हा खेळूया नवा खेळ, सोबत नव्या नात्यांचा मेळ" ही टॅग लाईन देखील झिम्मा-2 या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. या चित्रपटात आता नव्या भागात नव्या कलाकारांची देखील एंट्री झाली आहे. रिंकू राजगूरू आणि शिवानी सुर्वे हे झिम्माच्या टीम सोबत जोडले जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)