Jatra 2: नवीन वर्षांत ‘जत्रा2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला! केदार शिंदेंकडून टीझर पोस्टर प्रदर्शित
जत्रा या चित्रपटाच्या उदंड यशानंतर आता नववर्षात 'जत्रा 2' सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे केदार शिंदेंकडून पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
केदार शिंदे (Kedar shinde) दिग्दर्शित आणि लिखित जत्रा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, क्रांती रेडेकर यांच्यासोबतच कुशल बद्रिके, संजय खापरे यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी 'कोंबडी पळाली' आणि 'ये गं ये ये मैना' तुफान गाजली होती. या चित्रपटाच्या उदंड यशानंतर आता नववर्षात 'जत्रा 2' सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे केदार शिंदेंकडून पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)