Shahu Chhatrapati: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट
तर या सिनेमाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण सुखराज सांभाळणार आहे. विद्रोही फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित 'शाहू छत्रपती' भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. 'शाहू छत्रपती' या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता डॉ.जितेंद्र आव्हाड आहेत. तर या सिनेमाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण सुखराज सांभाळणार आहे. विद्रोही फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)