Boyz 3 Teaser: पुन्हा धुमाकूळ घालायला त्रिकुट सज्ज; समोर आला 'बॉईज 3’चा टीजर (Watch Video)

हा चित्रपट विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केला असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 'बॉईज 3' या सिनेमात प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हे कलाकार दिसणार आहेत.

Boyz 3 Teaser (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठीमध्ये असे फार कमी चित्रपट आहेत ज्यांचे एकापेक्षा जास्त भाग बनले आहेत. अशाच एक चित्रपटमध्ये ‘बॉईज’. यातील धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांनी महाराष्ट्रात नुसत धिंगाणा घातला होता. या चित्रपटाच्या यशानंतर याचा दुसरा पार्ट ‘बॉईज 2’ देखील चाहत्यांच्या भेटीला आला. या चित्रपटानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. म्हणूनच आता ‘बॉईज 3’ येऊ घातला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीजरमध्ये तीनही अतरंगी दाक्षिणात्य पेहेरावात दिसत आहेत. हा सिनेमा 16 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, हा चित्रपट विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केला असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 'बॉईज 3' या सिनेमात प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हे कलाकार दिसणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement