Boyz 3 Teaser: धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर सोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, एकदा झलक पाहाच

'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Boyz-3 (Photo Credit - Twitter)

‘बॅाईज 3’च्या (Boyz 3)  घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार, याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला असून विदुला चौगुले (Vidula Chougule) ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विदुला ‘बॅाईज 3’च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता ही विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)