Bin Lagnachi Goshta Motion Poster: 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातून प्रिया बापट- उमेश कामत पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र; पहा पहिली झलक
प्रिया आणि उमेश 12 वर्षापूर्वी टाईमप्लीज सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आले होते.
प्रिया बापट- उमेश कामत ही जोडी तरूणाईमध्ये हिट आहे. प्रिया बापट आणि उमेश आता 'जर तरची गोष्ट' नाटकानंतर सिनेमातही एकत्र दिसणार आहे. नुकतचं या सिनेमाचं मोशन पोस्टर समोर आलं आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' हा आगामी सिनेमा थिएटर मध्ये रीलीज होणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित हा सिनेमा 12 सप्टेंबरला रीलीज होणार आहे. या सिनेमामध्ये प्रिया आणि उमेश सोबत निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने, संजय मोने आदि कलाकार दिसणार आहेत.
बिन लग्नाची गोष्ट झलक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)