Amruta Khanvilkar ने नवीन वर्षात फिट राहण्याचा घेतला संकल्प, व्हिडियो पोस्ट करून दिली माहिती
मराठमोळी अभिनेत्रीने तिचा संकल्प चांगलाच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. अमृता खानविलकरने नवीन वर्षात फिट राहण्याचा संकल्प घेतला आहे.
नवीन वर्षात अनेकांकडून संकल्प केले जातात. व्यायाम करेल, सकाळी उठून फिरायला जाणार असे संकल्प अनेक जण करतात पण सुरवात करणारे अल्प असतात. परंतु मराठमोळी अभिनेत्रीने तिचा संकल्प चांगलाच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. अमृता खानविलकरने नवीन वर्षात फिट राहण्याचा संकल्प घेतला आहे. इंस्ताग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडियो आणि व्हिडियोला दिलेल्या कॅप्शनमुळे स्पष्ट होते. पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये ती वर्कआऊट करतांना दिसत आहे. अमृताचा ट्रेनर मंदार महामुनकर तिच्याकडून चांगलाच वर्कआऊट करून घेत असल्याचे दिसून येत आहे .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)