55th International Film Festival of India: दिग्दर्शक Navjyot Bandiwadekar यांना 'घरत गणपती' चित्रपटासाठी IFFI मध्ये प्राप्त झाला भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे.

Navjyot Bandiwadekar

55th International Film Festival of India: गोव्यातील 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या 'घरात गणपती' या मराठी चित्रपटासाठी, भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो. संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केला आहे. 55 व्या इफ्फीच्या समारोप समारंभात नवज्योत बांदिवडेकर यांना प्रमाणपत्र आणि 5 लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या श्रेणीतील पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्यांच्या अपवादात्मक कामासाठी बांदिवडेकर यांची एकमताने निवड केली. (हेही वाचा: Aananddoh: कार्तिकी एकादशी दिवशी तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा)

नवज्योत बांदिवडेकर यांना IFFI मध्ये भारतीय फीचर फिल्म सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now