Miss World 2024: चेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिस्कोव्हा जिंकला मिस वर्ल्ड 2024 चा खिताब
क्रिस्टीनाचा मॉडेलिंग करिअरचा अनुभव आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे तिला या स्पर्धेत विजेते घोषीत केले.
झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोवा हिला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात मिस वर्ल्ड 2024 चा मुकुट देण्यात आला. गेल्या वर्षीची विजेती पोलंडच्या कॅरोलिना बियावस्का हिने तिचा सन्मान केला. क्रिस्टीना केवळ सुंदरच नाही तर हुशार आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा ही केवळ सौंदर्याची स्पर्धा नसून सामाजिक जाणीव आणि बुद्धिमत्तेलाही महत्त्व दिले जाते. क्रिस्टीनाचा मॉडेलिंग करिअरचा अनुभव आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे तिला या स्पर्धेत विजेते घोषीत केले.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)