KK Last Song: केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' प्रेक्षकांच्या भेटीला, चाहते झाले भावूक
या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर शांतनु मोइत्रा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहत्यांनी केकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ म्हणजेच केके आता या जगात नाही. केके यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केके यांनी 'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमासाठी शेवटचं गाणं गायलं होतं. 'धूप पानी बहने दे' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर शांतनु मोइत्रा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहत्यांनी केकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)